Pm Kisan Yojana : सध्या निवडणुकीची गडबड सुरू आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक कामे थांबली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अनेक शासकीय कामांना ब्रेक लागला आहे.
काही योजनांची अंमलबजावणी देखील थांबली आहे. मात्र या निवडणुकीच्या रणधुमाळीत पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
खरे तर पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. याची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पैशांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 16 हप्ते देण्यात आले आहेत. मागील सोळावा हफ्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
हा हप्ता यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. दरम्यान आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचा पुढील हप्ता म्हणजेच 17 वा हप्ता कधी जारी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता याच पुढील हफ्त्यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या योजनेचा पुढील हप्ता अर्थातच सतरावा हप्ता हा आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
म्हणजे केंद्रात जे नवीन सरकार येईल त्या सरकारच्या माध्यमातून या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून 2024 ला लागणार आहे.
यामुळे या योजनेचा पुढील हफ्ता हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्यात जारी होऊ शकतो, असे बोलले जात आहे. तथापि, या संदर्भात केंद्रातील सरकारच्या माध्यमातून किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता दिला जाऊ शकतो अशी आशा आहे. असे झाल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, यात शंकाच नाही. विशेष बाब अशी की, पीएम किसानच्या पुढील हत्या सोबत नमो शेतकरीचा पुढील चौथा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.