Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा देशभरातील आठ कोटीहुन अधिक शेतकरी लाभ घेत आहेत. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.
आतापर्यंत या योजनेचे एकूण 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. विशेष बाब अशी की, 14 वा हप्ता नुकताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. या योजनेचा 14 वा हप्ता 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14व्या हफ्त्यापोटी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
मात्र आता या योजनेत मोठा बदल होणार असा दावा केला जात आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासन लवकरच एक मोठी भेट देणार असे सांगितले जात आहे. आता या योजनेअंतर्गत दरवर्षी आठ हजार रुपयाचा लाभ दिला जाणार असा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच या योजनेच्या रकमेत दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे.
खरंतर आगामी वर्षात लोकसभा निवडणुका राहणार आहेत तसेच पुढील वर्षी महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासन देशातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे तीन हप्ते दिले जात आहेत.
पण आता या योजनेत बदल केला जाणार असून दोन हजार रुपयांचे चार हफ्ते शेतकऱ्यांना दिले जातील असे सांगितले जात आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणारा 6,000 रुपयाचा लाभ आता वाढून आठ हजार रुपये एवढा होणार आहे. वास्तविक, जानेवारी महिन्यात याबाबत खूप चर्चा रंगल्या होत्या. पण हा निर्णय त्यावेळी झाला नाही.
आगामी वर्षात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय त्यावेळी न घेता निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार घेण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे यासाठी निधीची तरतूद देखील केंद्र शासनाकडून करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच, जर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
ज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकतीच नमो शेतकरी योजना देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देखील राज्यातील पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये मिळणार आहेत. अर्थातच पीएम किसानचे 6,000 आणि नमो शेतकरीचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
जर पीएम किसानचे पैसे वाढले तर नमो शेतकऱ्याचे देखील पैसे वाढू शकतात. अर्थातच पीएम किसानचे 8000 आणि नमो शेतकरी चे 8000 असं होऊ शकत. यामुळे आता केंद्रशासन काय निर्णय घेते आणि केंद्र शासनाने निर्णय घेतल्यानंतर राज्य शासन देखील यावर काय निर्णय घेते याकडे विशेष लक्ष राहणार आहे.