Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा शुभारंभ वर्तमानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 मध्ये झाला असून तेव्हापासून ही योजना अविरतपणे शेतकऱ्यांसाठी सुरूच आहे.
मात्र या योजनेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत अनेक बदल झाले आहेत. जसे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे तसेच रेशन कार्ड पात्र शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. यांसारख्या अनेक बदल या योजनेत झाले आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या योजनेअंतर्गत देशातील जवळपास आठ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे ₹6000 पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यात मिळतात.म्हणजे पात्र शेतकऱ्यांना दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे तीन हप्ते प्रोव्हाइड केले जातात.
दरम्यान या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून 13 वा हप्ता येण्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता काही मीडिया रिपोर्टमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा तेरावा हप्ता येईल असं सांगितलं गेलं होतं. मात्र तसं काही झालं नाही, संपूर्ण डिसेंबर महिना शेतकऱ्यांनी तेराव्या हफ्त्यासाठी वाट पाहिली मात्र शासनाने 13 वा हफ्ता जारी केला नाही.
अशातच आता तेराव्या हप्त्याबाबत मीडिया रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मीडियारिपोर्ट मध्ये तेरावा हप्ता हा जानेवारी महिन्यात विशेषता 26 जानेवारीच्या आतच शेतकऱ्यांना मिळू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
निश्चितचं मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा सत्यात उतरला तर देशातील करोडो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये शेतकऱ्यांना 1 जानेवारी रोजी या योजनेचा हप्ता देण्यात आला होता.
अशा परिस्थितीत यंदा देखील शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात या योजनेचा तेरावा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच 26 जानेवारी आधी केव्हाही शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळू शकतो असं त्या मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.