Pm Kisan Yojana : PM किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. पण हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. 18 व्या हफ्त्याची तारीख देखील सरकारने जाहीर केली आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही तारीख डिक्लेअर करण्यात आली असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. यामुळे ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.
केव्हा मिळणार 18 वा हफ्ता
पी एम किसान अंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते देण्यात आले असून मागील सतरावा हफ्ता 18 जून 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. दरम्यान या योजनेचा पुढील 18 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती पीएम किसान च्या वेबसाईटवरून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना देणार आहेत. याद्वारे ₹ 20,000 कोटींची रक्कम 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
PM किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता देय आहे, त्यामुळे तुमचे ई-केवायसी वेळेवर पूर्ण करा आणि सन्मान निधीचा लाभ घ्या असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
जर तुम्ही अजून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही पीएम किसान मोबाईल ॲपवर जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करू शकतात. पीएम किसान मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
तसेच शेतकरी बांधव सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शेतकरी ई-केवायसी करू शकतील. शिवाय, pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी OTP द्वारे सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.