Pm Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही मोदी सरकारने सुरू केलेली एक शेतकरी हिताची योजना (Farmer Scheme) आहे. या योजनेबाबत (Agriculture Scheme) एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी (Farmer) दिलासादायक बातमी समोर येत आहे.
खरं पाहता ही योजना आज देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पीएम किसान योजनेअंतर्गत, 6,000 रुपये वार्षिक पात्र शेतकऱ्यांना दिले जात आहेत. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हफ्त्यात वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. म्हणजे दर चार महिन्याला दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने शेतकरी बांधवांना या योजनेतून लाभ दिला जात आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर आता 12व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसानचा 12 वा हप्ता 5 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना मुख्य सचिव डॉ अरुणकुमार मेहता यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. ते म्हणाले की, या योजनेशी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 12 वा हप्ता 5 सप्टेंबरपर्यंत हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 12व्या हप्त्याचे पैसे वर्ग केले जातील, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.
70 लाख शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार नाही
पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी म्हणजेच केवायसीशी लिंक झालेली नाहीत, अशा शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तविक, केंद्र सरकारची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख 31 ऑगस्टपर्यंतच होती, परंतु अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आणि आधार लिंक केलेले नाही, त्यामुळे 12 वा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
याशिवाय, केवायसी प्रक्रियेनंतर, अनेक गैर-लाभार्थी आणि अपात्र शेतकऱ्यांना देखील 12 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. अशाप्रकारे लाभार्थी नसलेल्यांचा हा आकडा 70 लाखांवर पोहोचला आहे. लवकरच सरकार अपात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करू शकते. निश्चितच पाच तारखेला या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.