Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही एक महत्त्वाची केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही स्वप्नातली योजना आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. हे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने वितरित केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देऊ करण्यात आले आहेत.
या योजनेचा चौदावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याचे कृषी आयुक्त चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा 14 वा हफ्ता हा मे महिन्यात देऊ केला जाणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ दोन शहरात लवकरच सुरु होणार वंदे मेट्रो, 1 रुपये प्रति किलोमीटर राहणार भाडे, पहा….
दरम्यान या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न पाहायला मिळतात. यामध्ये या योजनेचा लाभ दुसऱ्याची शेत जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना पण मिळणार का? हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो.
दरम्यान आज आपण याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. खरं पाहता ही योजना देशातील गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या पार्श्वभूमीवर या योजनेची सुरुवात झाली आहे.
मात्र या योजनेचा लाभ हा केवळ आणि केवळ सातबारा धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच भूमीहिन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अर्थातच जे शेतकरी दुसऱ्याची शेत जमीन कसतात त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना स्वस्तात मिळणार डीएपी, वाचा सविस्तर
वास्तविक आपल्या भारत देशात बहुतांशी लोक त्यांच्याकडे स्वतःची जमीन नसल्याने इतर शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन कसत असतात. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
मात्र ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू झाली आहे यामुळे याचा लाभ केवळ आणि केवळ ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे अशाच शेतकऱ्यांना दिला जात आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन नाही ते शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
तसेच या योजनेचा लाभ परिवारातील एकाच सदस्याला मिळणार आहे. म्हणजेच नवरा, बायको तसेच अज्ञान मुल या परिवारातील नवरा किंवा बायको या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनला आता अतिरिक्त डबे जोडले जाणार, पहा…..