Pm Kisan Yojana: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी मायबाप शासन कायमच वेगवेगळ्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करत असते.
पीएम किसान सम्मान निधि योजना ही देखील शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकरी हिताची ही योजना मोदी सरकारची (Modi Government) सर्वात जास्त चर्चिली जाणारी योजना आहे.
जाणकार लोक या योजनेला शेतकरी हिताची योजना म्हणून संबोधत असतात. मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेचा देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी बांधव लाभ घेत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपल्या राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेतं.
निश्चितच कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने आजची ही बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी खास आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. ते सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना एकूण तीन हप्त्यांत दिले जातात. म्हणजेचं शेतकरी बांधवांना एका वर्षात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते या योजनेच्या माध्यमातून दिले जात आहेत.
निश्चितच यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र असे असले तरी या योजनेसाठी पात्र शेतकरी बांधवांना योजने संबंधित अनेक अडचणी कायमच भेडसावत असतात. अनेकदा काही शेतकरी बांधवांना योजनेचा हप्ता मिळत नाही मग तक्रार कुठे करायची असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या पुढ्यात उपस्थित राहतो.
खरं पाहता या योजनेच्या पात्र शेतकरी बांधवांना अगदी रजिस्ट्रेशन करण्यापासून ते हप्ते मिळवण्यापर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागतो किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सुचत नाही की आपण तक्रार कुठे करायची. मात्र आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजने संबंधित कोणतीही अडचण असल्यास आपण या योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करून तक्रार नोंदवू शकतात किंवा योजने संबंधित काही अडचण असल्यास माहिती प्राप्त करू शकतात.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही या योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता. याशिवाय 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना संपर्क साधता येणार आहे. त्याच वेळी, शेतकरी बांधव [email protected] या इमेल आयडीवर मेल करून त्यांच्या समस्येचे निराकरण देखील करू शकतात.