Pm Kisan Yojana : भारतात शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी अनेक कल्याणकारी योजना (Government Scheme) कार्यान्वित केल्या जातात. मायबाप शासन (Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेग-वेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) सुरू करत असते.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली एक केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मित्रांनो या योजनेचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेतात. आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो कि, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.
हे वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा तीन हप्त्यात दिले जातात. म्हणजे दर चार महिन्यांत येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या रकमेतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले आहेत, तर 12वा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांना दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी बांधव देखील बाराव्या हप्त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
मित्रांनो जर तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, तर आजची तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे आणि जर एखाद्याने ते केले नाही तर तो दोन हजार रुपयांच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतो. सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आज म्हणजे 31 ऑगस्ट 2022 आहे.
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केलेली नसेल, तर तुम्ही ते ताबडतोब करून घ्यावे. अन्यथा पुढील हप्ता चुकण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे ट्रान्सफर होऊ शकतात, असे मानले जात आहे. यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी आवश्यक केवायसी केलेली नसेल त्यांनी ताबडतोब हे काम करून घ्यावेत.
ई-केवायसी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे
ज्या शेतकरी बांधवांना या योजनेसाठी केवायसी करायची आहे अशा शेतकरी बांधवांना सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागणार आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर e-KYC चा पर्याय दिसेल त्यावर शेतकरी बांधवांना क्लिक करावे लागेल.
तिथे संबंधित शेतकरी बांधवांना आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे.
यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरचा तपशील द्यावा लागणार आहे.
आता शेतकरी बांधवांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल.
ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, अशा शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
ई-केवायसी करण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया तर जाणून घ्या
PM किसान योजनेसाठी केवायसी करण्यासाठी ऑफलाइन पद्धत देखील आहे यासाठी शेतकरी बांधवांना CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे बांधवांना आपले आधार कार्ड क्रमांक दाखवावे लागेल. पीएम किसान खात्यात लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक्स प्रविष्ट करावे लागतील. आता आधार कार्ड क्रमांक अपडेट केला जाईल. केंद्रावर फॉर्म सबमिट केला कि अशा शेतकरी बांधवांच्या फोनवर पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.