Pm Kisan Yojana: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. निश्चितच भारताची अर्थव्यवस्था देखील शेतीप्रधान राहणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर (Farming) अवलंबून असल्याने देशातील सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच कल्याणकारी योजना (Farmer scheme) अमलात आणत असतात.
पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील अशीच एक शेतकरी (Farmer) हिताची योजना आहे. ही योजना 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास बारा कोटी शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
या योजनेच्या पात्र शेतकर्यांना हे सहा हजार रुपये एका वर्षात दोन हजार रुपयाच्या एकूण तीन हप्त्यात हस्तांतरित केले जातात. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना 11 हफ्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता या योजनेचे कोट्यावधी शेतकरी बाराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या योजनेचा आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी लाभ घेत आहेत.
दरम्यान केंद्र सरकारने या योजनेत योजना सुरू केल्यापासून अनेक अमुलाग्र बदल देखील केले आहेत. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते मध्यंतरी या योजनेचा अनेक चुकीच्या शेतकऱ्यांनी देखील लाभ उचलला होता या अनुषंगाने केंद्र सरकारने या योजनेत मोठे बदल केले आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी (E-kyc) बंधनकारक केली आहे. खरं पाहता या योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै ठेवण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी बांधवांना तांत्रिक अडचणीमुळे अजूनही केवायसी करता आलेले नाही.
अशा परिस्थितीत शेतकरी हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा फायदा लक्षात घेता केंद्र सरकारने पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. निश्चितच यामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख केंद्र सरकारकडून 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापि केवायसी केलेली नसेल त्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे आव्हान देखील प्रशासनाकडून केले जात आहे.
यामुळे ज्या लोकांची केवायसी राहिली होती त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जाणकार लोकांच्या मते जर 31 ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांनी केवायसी केली नाही तर त्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागू शकते. अशा परिस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांनी केवायसी करणे आता अत्यआवश्यक बनले आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या योजनेचा बारावा हप्ता दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना लवकरात लवकर केवायसी करावी लागणार आहे.
ई-केवायसी करण्यासाठी प्रोसेस नेमकी आहे तरी कशी
सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
सबमिट OTP वर क्लिक करा.
आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.