Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. या अंतर्गत वर्षाला 6,000 रुपयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जात आहे. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे.
म्हणजेच एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत.
म्हणजेच या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 34 हजार रुपयांची भेट मिळाली आहे. त्यामुळे या योजनेची लोकप्रियता डे बाय डे वाढत चालली आहे.
विशेष म्हणजे या योजनेची वाढती लोकप्रियता पाहता अनेक राज्यातील राज्य सरकारांनी या योजनेच्या धर्तीवर तेथील शेतकऱ्यांसाठी नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने देखील याच योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चा आणि नमो शेतकरीचा दुहेरी लाभ मिळत आहे.
पी एम किसान अंतर्गत 6000 आणि नमो शेतकरी अंतर्गत सहा हजार असे एकूण वार्षिक 12,000 रुपयांची भेट राज्यातील शेतकऱ्यांना दिली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या याच पीएम किसान योजने संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
खरे तर या योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. हा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.
यामुळे या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या माध्यमातून योजनेचा आगामी हफ्ता कधीपर्यंत जमा होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक, पीएम किसान योजनेअंतर्गत दिली जाणारी 6000 रुपयांची रक्कम 12,000 केली जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता.
विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेतला जाईल असे म्हटले जात होते. मात्र काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात असे काही झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. पण आता या योजनेच्या पुढील हत्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हफ्ता हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.