Pm Kisan Yojana : भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी लोकसंख्या ही प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. देशात खरे पाहता अल्पभूधारक शेतकरी बांधवांचे (Farmer) प्रमाण सर्वाधिक आहे.
जमिनीची दिवसेंदिवस विभागणी होत असल्याने अल्पभूधारक शेतकरी बांधवांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कमी शेतजमिनीत आपला उदरनिर्वाह भागवणे अशा अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी मोठ्या जिकिरीचे काम बनले आहे. यामुळे 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी हिताची एक योजना (Farmer Scheme) सुरू केली आहे.
खरं पाहता अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना सुरू करत असते. मोदी सरकारने देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही अशीच एक शेतकरी हिताची योजना (Agriculture Scheme) सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.
या तारखेपर्यंत ई-केवायसी करा
मित्रांनो खरे पाहता मध्यंतरी अपात्र शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यामुळे या योजनेत केंद्र सरकारकडून मोठा बदल करण्यात आला असून आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 31 ऑगस्ट ही सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख ठेवली होती.
मात्र आता त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली असून 31 ऑगस्ट 2022 पर्यंत केवायसी करण्यासाठी शेतकरी बांधवांना अवधी देण्यात आला आहे. दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी न केल्यास ते 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. यामुळे पात्र शेतकरी बांधवांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन देखील केले जात आहे. आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी पीएम किसान योजनेत कशा पद्धतीने ई-केवायसी करायची याविषयी आज बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.
अशा प्रकारे ई-केवायसी करता येते बर
सर्वप्रथम पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत पोर्टलवर जा.
वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला ‘ई-केवायसी’चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांक भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि सर्च वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक येथे भरावा लागेल, ज्यावर एक OTP येईल.
हा OTP इथे एंटर करा आणि असे केल्याने तुमचे e-KYC यशस्वीरित्या पूर्ण होईल.