Pm Kisan Yojana : मित्रांनो पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Samman Nidhi Yojana) की केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Yojana) आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील पात्र शेतकरी बांधवांना (Farmer) वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना एका वर्षात समान तीन हप्त्यात दिले जातात. म्हणजेच दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत (Farmer Scheme) मदत दिली जाते.
दरम्यान या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकरी बांधवांना एकूण अकरा हफ्ते मिळाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव या योजनेच्या बाराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरं पाहता गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच या योजनेचा (Government Scheme) हफ्ता मिळाला होता. मात्र यावर्षी हप्त्याला उशिर होत असल्याने शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत पडला आहे. अशा परिस्थितीत बारावा हप्ता केव्हा येईल यासंदर्भात शेतकरी बांधव मोठे उत्सुक पाहायला मिळत आहेत.
भुलेख पडताळणी हाच खरा अडथळा ठरला आहे बर…!
मित्रांनो खरं पाहता मध्यंतरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ बनावट शेतकऱ्यांना देखील मिळत होता. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेले लोकही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या अनेक तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या. अशा परिस्थितीत या योजनेच्या नियमावलीत सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेमध्ये सुरू असलेली धांधली थांबवण्यासाठी भुलेखाची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले.
योजनेच्या नियमांविरुद्ध किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे किती शेतकरी आहेत, याची माहिती विचारण्यात आली. यामुळे देशभरात सध्या राज्यांच्या वतीने भुलेख पडताळणीचे काम सुरु करण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. भूलेख पडताळणीचे काम पूर्ण करून सर्व लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करण्यात येत आहे. जाणकार लोकांच्या मते, भुलेख पडताळणीमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. मात्र आता भुलेख पडताळणी अंतिम टप्प्यात आली असल्याने 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधीही येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 9वा हप्ता आला होता बर…!
मागील पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता 9 ऑगस्ट रोजी आला होता. यंदा ऑक्टोबर आला असूनही शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. योजनेतील अनियमितता लक्षात घेऊन राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. दरम्यान पीएम किसान पोर्टलला भेट देऊन शेतकरी ई-केवायसी करू शकतात.
ई-केवायसी केल्यानंतरचं या योजनेच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारने दिलेल्या नमुन्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न, मालमत्ता इत्यादी तपशील भरले जातात. शेतकऱ्याचे बँक खाते व इतर माहिती कृषी विभागात दिली जाते. पडताळणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याच्या खात्यात 2 हजार रुपयेचा हफ्ता वर्षातून तीनदा येतो.