Pm Kisan Yojana : भारत हा शेतीप्रधान देश म्हणून जगात विख्यात आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडित असल्याने शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी देशात वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा देखील समावेश आहे. ही केंद्रीय पुरस्कृत एक महत्त्वाची स्कीम आहे.
याच्या माध्यमातून देशभरातील करोडो शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना मात्र हे सहा हजार रुपये एक रकमी मिळत नाहीत. तर दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
दरम्यान आता तेरावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना देऊ केला जाणार आहे. परंतु, 11वा हप्ता देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना दिला गेला तर बारावा हप्ता मात्र आठ कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे. म्हणजेच लाभार्थी संख्येत मोठी घट झाली आहे.
दरम्यान लाभार्थी संख्येत घट होण्याची काही कारणे आहेत. यामध्ये केवायसी न करणे हे प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त बँक अकाउंट नंबर, आधार नंबर चुकीचे असणे हे देखील प्रमुख कारण राहिले आहेत. पण योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना ही चुकीची माहिती चेंज करता येते.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत माहिती दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही शेतकरी बांधव घर बसल्या ही माहिती दुरुस्त करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण पीएम किसान योजनेच्या अर्जात जर काही माहिती चुकीची प्रविष्ट झाली असेल तर ती कशा पद्धतीने अपडेट केली जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
पीएम किसानची माहिती दुरुस्त करण्यासाठी असा करावा लागेल अर्ज
योजनेच्या अर्जात झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नरचा या ऑप्शन ऑप्शनखाली असलेल्या हेल्प डेस्कवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. या पेजवर आधार नंबर, अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबरची नोंद शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.
विचारलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांना गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करावयाचे आहे. यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो ओपन होणार आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांना त्यांची संपूर्ण माहिती दिसणार आहे. येथे मग ग्रिव्हन्स टाईपचा एक बॉक्स दिसेल. या बॉक्सवर क्लिक करून जी चुक असेल ती शेतकऱ्यांना सिलेक्ट करावी लागणार आहे.
म्हणजे जर शेतकऱ्यांचा बँक अकाउंट नंबर चुकीचा असेल, तर बँक अकाउंट नंबर चुकीचा असल्याचा ऑप्शन निवडावा लागेल. मग डिसक्रीप्शन बॉक्समध्ये हिंदी किंवा इंग्रजीत अकाउंट नंबरची माहिती दिलेली असेल. मग ही माहिती भरून त्यानंतर कॅपचा भरावा लागणार आहे. ही माहिती फील अप केल्यानंतर सबमीटच्या बटनवर क्लीक करावे लागणार आहे. अशा पद्धतीने शेतकरी आपली माहिती अपडेट करू शकणार आहेत.