Pm Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. यामुळे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांना (Farmer) शेती (Farming) आणि मशागत करण्यात खूप मदत होते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले असून, सध्या ते 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
ताज्या अपडेटनुसार, या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये पाठवले जाऊ शकतात. अनेक वेळा तुम्ही डेटा अपडेट करत असताना असे घडते, त्याच वेळी काही चूक होते, ज्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेच्या (farmer scheme) हप्त्यापासून वंचित राहता. यामुळे या योजनेत नोंदणीनंतरही शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते जाणून घेऊया.
या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्यात
फॉर्म भरताना तुमचे नाव इंग्रजीत लिहा.
ज्या शेतकऱ्यांचे नाव अर्जात हिंदीत आहे, त्यांनी ते इंग्रजीत करावे.
अर्जातील नाव आणि बँक खात्यातील अर्जदाराचे नाव वेगळे असल्यास तुमचे पैसे अडकू शकतात.
बँकेचा IFSC कोड, बँक खाते क्रमांक आणि गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली तरी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
अशा चुका दुरुस्त करा
चुका सुधारण्यासाठी प्रथम तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. आता ‘फार्मर्स कॉर्नर’चा पर्याय निवडा. येथे तुम्हाला ‘Aadhaar Edit’ चा पर्याय दिसेल, येथे तुम्ही तुमच्या आधार क्रमांकामध्ये सुधारणा करू शकता. तुमच्या बँक खाते क्रमांकामध्ये चूक झाली असेल, तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला कृषी विभाग कार्यालय किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल.
ई-केवायसी केले नाही तरी पैसे अडकू शकतात
अनेक दिवसांपासून सरकारकडून शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. जर तुम्ही या तारखेपूर्वी ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.