Pm Kisan Yojana : पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Samman Nidhi Yojana) ही केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेच्या (Yojana) माध्यमातून देशभरातील जवळपास दहा कोटींहून अधिक शेतकरी बांधवांना (Farmer) वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे वार्षिक सहा हजार रुपये एकूण तीन समान हप्त्यांत दिले जातात. म्हणजेच दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने शेतकरी बांधवांना पैसे मिळत असतात.
आतापर्यंत या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून शेतकरी बांधवांना 11 हप्ते देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत देशभरातील कोट्यवधी शेतकरी बांधव या योजनेच्या बाराव्या त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या योजनेचा बारावा हप्ता सप्टेंबर महिन्यातच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार होता.
मात्र, आता या योजनेचा बारावा हप्ता ऑक्टोबर महिन्यातील कोणत्याही दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भुलेखांच्या पडताळणीमुळे पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत सुमारे 21 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
हीच स्थिती देशातील इतर राज्यांची आहे. या योजनेचा गैरफायदा घेतल्याची आतापर्यंत अशी लाखो प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आता पात्र शेतकरी बांधवांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अपात्र शेतकरी बांधवांकडून या योजनेचा पैसा देखील आता वसूल केला जात आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांमध्ये आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आज आपण या योजनेसाठी लाभार्थी यादीत नाव कसे बघायचे या महत्वपूर्ण विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.
लाभार्थी यादीत आपले नाव कसे पहावे बर..!
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा हफ्ता मिळेल की नाही याबाबत संभ्रमावस्था असेल तर आपण आपले नाव लाभार्थी यादीमध्ये चेक करू शकतात. जर तुम्ही 12 व्या हप्त्याची वाट पाहत असाल आणि लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहू इच्छित असाल तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
फार्मर्स कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर, लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.