Pm Kisan Yojana: भारता हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे मायबाप शासनाचे (Government) कर्तव्य आहे. या अनुषंगाने आपले सरकार गरीब आणि गरजू शेतकर्यांच्या (Farmer) मदतीसाठी विविध योजना (Farmer Scheme) राबवत आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा शासनाचा मानस असतो. पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा देशभरातील जवळपास 12 कोटी शेतकरी बांधव फायदा घेत आहेत. आपल्या राज्यातील एक कोटी पाच लाख शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम थेट जमा केली जाते. दरवर्षी करोडो शेतकरी या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असतात.
या योजनेचा 12 वा हप्ता महत्त्वाचा का आहे बरं..!
खरं पाहता, पीएम किसान योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा एक हफ्ता जमा केला जातो. अशा पद्धतीने वर्षातून तीन हप्ते म्हणजेच सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी गरीब शेतकऱ्यांना 11 हप्ते देऊ करण्यात आले आहेत.
आता 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा देशातील तमाम शेतकरी बांधव पाहत आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचा हा 12 वा हप्ता शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मुसळधार पावसाने अनेक राज्यांमध्ये कहर केला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या योजनेची मिळणारी ही आर्थिक मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ऐका या’ लोकांना मिळणार नाही योजनेचा हप्ता
जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नसेल तर अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा बारावा हप्ता दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केवायसी करण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै होती.
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुकीचा डेटा भरला आहे त्यांनादेखील बाराव्या हफ्त्यापासून वंचित रहावे लागू शकते.
शेतकऱ्याच्या आधार कार्ड आणि फॉर्ममधील नावाचे स्पेलिंग चुकीचे असल्यास शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार नाहीत.
बँक खात्याची माहिती बरोबर नसेल तरी देखील अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून जोपर्यंत दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत वंचित केले जाऊ शकते.
ज्यांनी या योजनेसाठी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आहेत त्यांना या योजनेतून कायमचे वंचित ठेवले जाऊ शकते.