PM Kisan Yojana : एक जानेवारी 2019 या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेच्या सुरुवातीला 11 कोटीच्या आसपास लाभार्थी होते. मात्र मध्यंतरी शासनाला या योजनेचा काही अपात्र शेतकरी देखील लाभ घेत असल्याचे आढळून आले.
परिणामी, शासनाने या योजनेसाठी काही निकष ठरवून दिलेत. यामध्ये केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले, आधार सिडींग बंधनकारक करण्यात आले, लँड सिडींग बंधनकारक करण्यात आले. परिणामी देशातील एकूण लाभार्थ्यांची संख्या कमी झाली.
सध्या या योजनेचे देशातील फक्त आणि फक्त साडेआठ कोटी शेतकरी पात्र आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता पंधरावा हप्ता राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांना दिला गेला आहे.
ज्यावेळी या योजनेची सुरुवात झाली तेव्हा ही संख्या एक कोटी वीस लाखांच्या घरात होती. यानंतर मात्र वेगवेगळ्या अटी आणि निकषांमुळे ही संख्या कमी होत गेली.
14 वा हप्ता वितरित झाला तेव्हा तरी ही संख्या फक्त आणि फक्त 70 लाख एवढीच होती. त्यानंतर मात्र शासनाच्या आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आणि जनजागृतीमुळे ही लाभार्थी संख्या वाढली आहे.
खरंतर पीएम किसान योजनाअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचा लाभ संबंधितांना मिळत आहे. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
मागील पंधरावा हप्ता हा राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला असून येत्या काही दिवसात या योजनेचा सोळावा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात वितरित होऊ शकतो. दरम्यान याच योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पी एम किसान योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील चार लाख शेतकऱ्यांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 86.48 लाख शेतकरी ई केवायसी मोहिमेमुळे या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत.
मात्र अजूनही चार लाख शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केव्हायसी करावी नाहीतर त्यांना योजनेच्या लाभांपासून वंचित राहावे लागू शकते असे बोलले जात आहे.