Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची लोकप्रियता भारतात खूपच अधिक आहे. हेच कारण आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रातही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.
पीएम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. विशेष बाब अशी की, या योजनेचा पुढील हप्ता अर्थात 16 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागली आहे.
या योजनेचा पुढील हप्ता हा मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
पण या लोकप्रिय योजनेचा लाभ देशातील काही शेतकऱ्यांना मिळतच नाहीये. काही कारणांमुळे या योजनेचा लाभ पात्र असूनही शेतकऱ्यांना घेता येत नाहीये.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ का बंद करण्यात आला आहे असा मोठा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, केंद्र शासनाने या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांना आधी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत होता मात्र आता मिळतं नाहीये अशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि या समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
विशेष म्हणजे ही खास मोहीम येत्या दोन दिवसांनी अर्थातच 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांचा हप्ता काही कारणास्तव थांबलेला आहे त्यांना देखील आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकणार आहे.
याबाबत कृषी मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हे विशेष अभियान 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये राज्य शासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा समावेश राहणार आहे.
विशेष बाब अशी की हे अभियान देशभरातील चार लाखाहून अधिक कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून राबवले जाणार आहे. यामुळे ज्या कारणांनी शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता बंद झाला असेल ते कारण शोधून त्यावर समाधान काढले जाणार आहे.