Pm Kisan Yojana And Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी नामक योजना सुरू केली आहे. ही योजना केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती.
तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पैशांचे वितरण होते. म्हणजेच दर चार महिन्यांनी एक हप्ता अशा पद्धतीने या योजनेच्या पैशाचे वितरण सुरु आहे.
या योजनेचा जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. यामुळे ही योजना देशात खूपच लोकप्रिय बनले आहे. हीच लोकप्रियता पाहता राज्यातील शिंदे सरकारने देखील या योजनेच्या धर्तीवर नवीन योजना सुरू केली आहे. या नवीन योजनेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत.
परंतु दोन्ही योजनेचे स्वरूप एकच आहे. तसेच जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी साठी सुद्धा पात्र आहेत. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे दोन हजार असे चार हजार रुपये एका हप्त्याला मिळतात.
म्हणजेच वार्षिक पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे 12 हजार रुपये मिळत आहेत. पण पीएम किसानचे आत्तापर्यंत 16 हप्ते वितरित झाले आहेत तर दुसरीकडे नमो शेतकरीचे आतापर्यंत फक्त तीनच हप्ते वितरित झाले आहेत. विशेष म्हणजे दुसरा आणि तिसरा हप्ता पीएम किसानच्या 16 व्या हफ्त्याबरोबरच वितरित करण्यात आला आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांना पीएम किसान च्या 17 व्या हप्त्याची आणि नमो शेतकरीच्या चौथ्या हफ्त्याची आतुरता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा पुढील हप्ता आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाणार आहे.
म्हणजेच चार जून नंतरच या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत. पण या योजनेचे पुढील हप्ते प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करावी लागणार आहेत. शेतकऱ्यांना आता ई-केवायसी, आधार सीडींग आणि लँड सीडींग ही तीन महत्त्वाची कामे लवकरात लवकर करावी लागणार आहेत.
तसेच जर फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली असेल तर ती मिस्टेक देखील दुरुस्त करावी लागणार आहे. अन्यथा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो. बँक डिटेल्स चुकीचे असतील तर त्या देखील व्यवस्थित कराव्या लागणार आहेत. तुमचे खाते बंद झाले असेल तर दुसरे ऍक्टिव्ह बँक अकाउंट ऍड करावे लागणार आहे.