Pm Kisan Yojana : पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही केंद्राद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmer Scheme) आहे. या योजनेसाठी (Agricultural Scheme) 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार (Modi Government) सर्व खर्च उचलत आहे.
अशा परिस्थितीत या योजनेचा (Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) केंद्राकडून एक महत्त्वाच अपडेट दिल गेला आहे. मित्रांनो जे लोक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत ते 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील एक कोटीच्या आसपास शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
अशा परिस्थितीत राज्यातील देखील लाखो शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या महिन्यात पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता येणार आहे. मात्र, भुलेख पडताळणीचे काम अनेक राज्यांत सुरू आहे. त्यामुळे 12वा हप्ता देण्यास विलंब होत आहे. आता हाती आलेल्या ताज्या अपडेटनुसार, येत्या दोन आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत. यामुळे निश्चितच देशभरातील 10 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
अपात्र शेतकऱ्यांची संख्या वाढतच आहे
2018 मध्ये सुरु करण्यात आलेल्या पीएम किसान सम्मान निधि योजनेत योजना सुरू झाल्यापासून अनेक बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी अनिवार्य करणे हा देखील असाच एक महत्त्वाचा बदल आहे. अशा परिस्थितीत या पडताळणी प्रक्रियेत अपात्र शेतकऱ्यांची देखील संख्या वाढली आहे. प्रत्येक राज्यातून लाखो शेतकरी असे सापडले आहेत, जे अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेत होते.
सध्या सरकार अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. आता गेल्या काही दिवसांपासून अपात्र शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या सर्व हप्त्यांचे पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केला आहे. या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी शेतकरी 155261 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
अजूनही शेतकरी ई-केवायसी करू शकतात
दरम्यान, पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर नियमित अंतराने काही बदल होत आहेत. अधिकृत वेबसाइटवरून ई-केवायसीसाठी वेळ मर्यादा पर्याय पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. तथापि, शेतकरी अद्याप वेबसाइटद्वारे ई-केवायसी करू शकतात. त्याच वेळी, तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे.