Pm Kisan Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील असेच शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांना 12 हप्ते देण्यात आले आहेत. खरं पाहता या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने दिले जातात.
अशा परिस्थितीत आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून तेरावा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये तेरावा हफ्ता फेब्रुवारी महिन्यातील कोणत्याही दिवशी शेतकरी बांधवांना दिला जाऊ शकतो असे सांगितले आहे. अशातच या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय अर्थसंकल्प सुरू असून या अर्थसंकल्पात या योजनेच्या नीधीमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरं पाहता या योजनेच्या निधीत वाढ व्हावी या अनुषंगाने अनेकदा शेतकरी संघटना आणि प्रशासनातील बड्या व्यक्तींनी मागणी केली आहे. दरम्यान आता यावर्षी नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने पी एम किसान सन्माननीय योजना या शेतकरी हिताच्या योजनेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठी घोषणा होऊ शकते आणि या सन्मान निधीच्या रकमेत वाढ होऊ शकते असा दावा केला जात आहे.
पीएम किसान सन्मान निधीची रक्कम खरचं वाढणार का? आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता देशभरातील 11 कोटी हून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आला होता. मात्र, केंद्र शासनाने 11व्या हप्त्यानंतर योजनेत मूलभूत बदल केले. जमीन पडताळणी आणि केवायसी बंधनकारक करण्यात आली. अशा परिस्थितीत या योजनेचे अनेक अपात्र शेतकरी वगळले गेले.
यामुळे बारावा हप्ता हा देशभरातील केवळ 8.50 कोटी शेतकऱ्यांनाचं मिळाला. एका आकडेवारीनुसार योजनेचे जवळपास एक कोटी 86 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेसाठी आता कमी निधी खर्च करावा लागणार आहे. यामुळे या योजनेचा जो पैसा वाचणार आहे तो पैसा या योजनेच्या रकमेत वाढ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान या योजनेअंतर्गत किती रक्कम वाढेल यासाठी नेमकी कारणे काय राहतील हे आता आपण जाणून घेणार आहोत. पीएम किसान योजनेच्या रकमेत किती वाढ होणार आणि वाढ होण्याचे इतर कारणे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
ब्रेकिंग ; पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार ‘इतक्या’ हजाराची वाढ, हे राहणार प्रमुख कारण