Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून या योजनेचा आपल्या महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक लाभ देण्याचे प्रावधान आहे.
हे वार्षिक सहा हजार रुपये मात्र पात्र शेतकऱ्यांना एकरकमी न देता टप्प्याटप्प्याने देऊ केले जातात. 2 हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचे स्वरूप आखण्यात आले आहे. आतापर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या लाभार्थ्यांना 12 हप्ते प्रदान करण्यात आले आहेत.
अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधव तेराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे हा तेरावा हप्ता येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया सध्या राबवली जात आहे. निश्चितच, योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचा शासनाचा मानस आहे.
दरम्यान आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव लाभं उचलत आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी धक्केदायक आकडेवारी समोर आली आहे. खरं पाहता या योजनेचा मध्यन्तरी अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला. परिणामी केंद्र शासनाने या योजनेचे नियम चेंज केले.
आतां या योजनेचा केवायसी केलेल्या आणि जमिनीची पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ देऊ केला जाणार आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्यांना या योजनेचा येणारा तेरावा हप्ता मिळणार नाही. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील 5 लाख 94 हजार 367 पात्र शेतकऱ्यांपैकी 18% पात्र शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसल्याचे समोर आले आहे.
म्हणजेच पीएम किसान साठी पात्र असलेल्या नगर जिल्ह्यातील 1 लाख 8 हजार 398 शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. केवळ 4 लाख 85 हजार 969 अर्थातच एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी 82 टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. त्यामुळे केवळ केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
तालुकानिहाय केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
नगर तालुक्यातील – ६ हजार २६८
नेवासे-८ हजार ७०९
श्रीगोंदे-९ हजार ३२३
पारनेर- ९ हजार २७३
पाथर्डी-८ हजार २२६
शेवगाव – ९ हजार २३
संगमनेर-८ हजार ८८९
अकोले-१० हजार ५३८
श्रीरामपूर-२ हजार ६२५
राहुरी-७ हजार ७१०
कर्जत-९ हजार ४४०
जामखेड-७ हजार १५५
राहाता-६ हजार २७
कोपरगाव-४ हजार १२०
तसेच इतर तालुक्यातील १ हजार ७२ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी केवायसी केलेली नाही.