Pm Kisan Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपसण्याचा प्रयत्न होत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे.
या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे.
आतापर्यंत या योजनेचे एकूण 16 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. विशेष म्हणजे या योजनेच्या 17 व्या हप्ता संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीचे चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून उर्वरित तीन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या धामधुमीत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जे सरकार केंद्रात सत्ता स्थापन करेल त्या सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढील सतरावा हप्ता जमा केला जाणार आहे.
जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. खरंतर, भारतीय हवामान खात्याने यावर्षी 31 मे ला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असे म्हटले आहे.
तसेच हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेतच म्हणजेच सात जूनच्या सुमारास आगमन होऊ शकते असे सांगितले आहे. यामुळे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरीप हंगामाच्या पीक पेरणीला सुरुवात होणार आहे.
सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पूर्वपशागतीच्या कामात व्यस्त आहेत. अशातच आता जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पीएम किसानचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो अशी बातमी समोर आली आहे.
यामुळे जर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेत तर याचा खरीप हंगामातील पीक पेरणी साठी उपयोग होणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.
तथापि, पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून समोर आलेली नाही. यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.