Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशात केंद्राच्या माध्यमातून राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
हा लाभ शेतकऱ्यांना एकरकमी न देता दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दिला जातो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते पात्र शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता या योजनेचा तेरावा हप्ता लवकरच हस्तांतरित होणार आहे. विशेष म्हणजे याची तारीख देखील डिक्लेअर झाली आहे. आज आपण याच संदर्भात सखोल माहिती जाणून घेणार आहोत.
खरं पाहता ही योजना वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याची योजना आहे. या योजनेचा शुभारंभ 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आला आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जेवढे पण हफ्ते दिले गेलेत ते हफ्ते स्पेशल दिवशीचं पात्र शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत. दरम्यान आता तेरावा हप्ता देखील अशाच एका स्पेशल दिवशी पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येणारा 13वा हफ्ता हा प्रजासत्ताक दिनाच्या आधी दिला जाणार आहे. 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण असून त्याआधीच 23 जानेवारी रोजी म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने पीएम किसानचा तेरावा हप्ता देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
खरं पाहता प्रजासत्ताक दिनाची सुरवात ही 2021 पर्यंत 24 जानेवारीपासून होत असे. परंतु मोदी सरकारने 2021 मध्ये हा पायांडा मोडीत काढत 23 जानेवारीपासून अर्थातच नेताजींच्या जयंती पासून प्रजासत्ताक दिनाच्या पर्वाला सुरुवात केली. दरम्यान आता 23 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या सुरवातीला आणि नेताजींच्या जयंतीला पीएम किसानचा तेरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची संवादही साधणार आहेत. हा तेरावा हफ्ता मात्र ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे आव्हान देखील आता कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून तेराव्या हफ्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.