Pm Kisan Yojana 18th Installment : केंद्रातील सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जातात. म्हणजे एका वर्षात तीन समान हफ्ते मिळतात.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळालेले आहेत. मागील 17 वा हप्ता हा श्रीक्षेत्र वाराणसी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. 18 जून 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री क्षेत्र काशी येथे गेले होते.
दरम्यान पंतप्रधान महोदयांच्या याचं श्रीक्षेत्र काशीदौऱ्यावेळी पीएम किसानच्या लाभार्थ्यांना 17 वा हप्ता वितरित करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागील सतराव्या हप्त्याचा देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.
राज्यातील ही जवळपास 80 ते 85 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. पण आता या योजनेच्या पुढील हफ्याचे वेध लागले आहे. या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत जमा होणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.
आतापर्यंत या योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे म्हटले जात होते. मात्र आता या योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोबर मध्ये नाही तर नोव्हेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल असे सांगितले जात आहे.
यामुळे नेमका पीएम किसानचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार ? हा मोठा यक्षप्रश्न आहे. तथापि, येत्या काही महिन्यांनी महाराष्ट्रासहित देशातील काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत, केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसानचा पुढील हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा करेल अशी शक्यता आहे.
या सदर राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच या योजनेचा पुढील हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो अशी शक्यता आहे. पण, याबाबत अजून कोणतीच अधिकृत अपडेट हाती आलेले नाहीये. यामुळे याचा पुढील हप्ता कधीपर्यंत मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.