Pm Kisan Yojana 15th Installment : केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही पीएम किसान चे लाभार्थी असाल तर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
जसं की आपणास ठाऊकच आहे की पी एम किसान योजना एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो. या अंतर्गत मिळणारे सहा हजार रुपये दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वर्षभरात एकूण 3 हफ्त्यात दिले जातात.
दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता मिळतो.आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. 14 वा हप्ता जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.
मागील हफ्ता 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला होता.
यानंतर आता पंधराव्या हफ्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पंधरावा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.
केव्हा जमा होणार पैसे
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू झाली आहे. शासन स्तरावर यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे आगामी काही दिवसात या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत केंद्र शासनाने अजून अधिकारीक घोषणा केलेली नाही. मात्र या योजनेचा पुढील हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
15वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करावे लागणार?
दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तीन महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. यामध्ये पहिले काम म्हणजे जमिनीची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. दुसरे काम असे की, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक करावा लागणार आहे. याशिवाय तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे ई-केवायसी पूर्ण झालेले नसेल तर ते लवकर पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. या तीन गोष्टी जो शेतकरी पूर्ण करणार नाही त्यांना या योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही.