Pm Kisan Yojana 13th Installment Date : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. मात्र या योजनेअंतर्गत दिला जाणारा हा लाभ शेतकऱ्यांना एकरकमी दिला जात नाही.
म्हणजेच या योजनेअंतर्गत दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने पैसे दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. दरम्यान आता तेराव्या हफ्त्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच तेराव्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.
एका प्रतिष्ठित न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता म्हणजेच तेरावा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात कार्यक्रमादरम्यान देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 29 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रम घेणार आहेत.
हा मन की बात कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय नागरिकांशी संवाद साधण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अनेकदा पीएम मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून नागरिकांना विविध योजनेचा लाभ दिला आहे. अशातच आता 29 तारखेला होणाऱ्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता शेतकरी बांधवांना हस्तांतरित करू शकतात अशा चर्चेला उधाण आल आहे.
निश्चितच याबाबत अजून कोणतीही उपचारीक घोषणा झालेली नाही मात्र कार्यक्रमाचे महत्त्व पाहता आणि गेल्या वर्षी महिन्यातच पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला असल्याने 29 तारखेला पीएम मोदी या योजनेचा येणारा तेरावा हप्ता हा शेतकरी बांधवांना देऊ शकतात अशी दाट शक्यता तयार झाली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी थेट शेतकऱ्यांशी संवादही साधणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेच्या दोन हजाराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून लवकरच शेतकऱ्यांना यां योजनेचा आर्थिक लाभ हा मिळणार आहे. दरम्यान ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली असेल त्यांनाच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.