Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 2019 मध्ये सुरू केलेल्या पीएम किसान सम्मान निधि योजनेचे (Yojana) देशभरात दहा कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी बांधव आहेत.
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेत असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. दरम्यान या योजनेचे पात्र शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आता बाराव्या हफ्त्यासंदर्भात एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार आता या योजनेचा (Farmer Scheme) बारावा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आपल्या हस्ते देशातील दहा कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना हस्तांतरित करणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, बाराव्या हप्त्यासाठी 25 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी केंद्र शासन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी पुसा कॅम्पसमध्ये कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी शेतकऱ्यांना 12 वा हप्ता पाठवला जाणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर समवेत सर्व राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 25 हजार कोटी रुपये पाठवले जातील.
दरम्यान अधिकारी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ उचलला असल्याने या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र शेतकरी बांधवांना केवायसी करण्यासाठी नाना प्रकारचे अडथळे येत असल्याने या योजनेचा बारावा हप्ता हा उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत आहे. दरम्यान आता 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 12वां हफ्ता दिला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला गेला असल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.