Pm Kisan Yojana : भारतात शेतकरी हिताच्या (Farmer) अनेक योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे.
ही योजना 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Sarkar) सुरू केली आहे. मोदी सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना (Agricultural Scheme) समजली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत (Yojana) देशभरातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
दर चार महिन्यांनी या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हफ्ता दिला जातो. म्हणजे 2 हजाराचे एकूण तीन हफ्ते एका वर्षात शेतकरी बांधवांना दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.
आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना पाठवले आहेत, तर आता देशातील कोट्यावधी पात्र शेतकरी बांधव 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मित्रांनो एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील देखील एक कोटीहून अधिक पात्र शेतकरी बांधव या योजनेच्या बाराव्या बाराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता कधी येणार?
हाती आलेल्या ताज्या अपडेटनुसार, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबरच्या कोणत्याही तारखेला येऊ शकतो. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये द्यावयाच्या रकमेचा पहिला हप्ता दिला जातो. यानंतर, दुसरा हफ्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यात येतो.
त्याचवेळी शेतकऱ्यांना 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान एका वर्षातला तिसरा हप्ता मिळेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मोदी सरकारने ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. ही योजना प्रामुख्याने देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आली होती.
मात्र नंतरच्या काळात या योजनेत नावीन्यपूर्ण बदल घडवून आणले आहेत. या योजनेच्या आराखड्यात योजना सुरू झाल्यापासून अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. या योजनेचा आता देशातील सर्व शेतकरी कुटुंबांना या लाभ देण्यात येत आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता लागू झाली आहे. यामुळे या योजनेचे स्वरूप अजूनच व्यापक बनले आहे.
अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता. यामुळे योजनेसाठी केवायसी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2022 केवायसी करण्याची अंतिम तारीख होती.
अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली नसेल त्यांना या योजनेचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे जाणकार सांगत आहेत. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेचा बारावा हप्ता सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील एक कोटिहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.