Pm Kisan Yojana: देशात शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान योजना नामक योजना केंद्र सरकारकडून (Central Government) राबवली जात आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेंतर्गत (Farmer Scheme) शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना (Government scheme) सुरू करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले जाते.
दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवले जातात
या योजनेचा समावेश केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत केला जातो. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जातात. आतापर्यंत सरकारने एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. आता शेतकरी बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात
ई-केवायसी (E-Kyc) करण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. जर शेतकऱ्यांनी या तारखेपूर्वी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले नाही, तर ते १२व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुकीचा डेटा भरला असेल, त्यांनाही या योजनेपासून वंचित ठेवता येईल. अशा परिस्थितीत अशा लोकांना धक्का बसू शकतो.
पुढचा हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेच्या पुढच्या म्हणजे 12व्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर लवकरच करोडो शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वास्तविक, सरकार पुढील हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवू शकते.
अवैध लाभार्थ्यांना नोटीस
अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हे करणार्यांवर सरकार कडक झाले आहे. सरकारकडून अशा लोकांना पैसे परत करण्यासाठी नोटीस पाठवली जात आहे. तत्काळ पैसे परत न केल्याने या लोकांवरही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले.