Pm Kisan Yojana: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांची (Farmer) आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने भारत सरकार (Central Government) नेहमीच प्रयत्न करत असते.
केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) देखील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmer Scheme) म्हणून ओळखली जाते. या योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये वर्ग केले जातात.
दर चार महिन्यांनी मिळतो 2 हजाराचा हफ्ता
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकचं आहे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये ट्रान्सफर होतात. म्हणजेचं वर्षात एकूण तीन हप्त्यात सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत मोदी सरकारने एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. 11वा हफ्ता पात्र शेतकऱ्यांना 31 मे रोजी मिळाला होता. यामुळे या योजनेचे पात्र शेतकरी आता बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यामुळे शेतकरी 12 व्या हप्त्यापासून वंचित राहणार
मित्रांनो मध्यंतरी मोदी सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी कंपल्सरी केली होती. pmkisan.gov.in वर ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत संपली आहे. ही प्रक्रिया 31 तारखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया निर्धारित तारखेपर्यंत पूर्ण केलेली नाही ते 12व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार बरं?
पीएम किसान योजनेच्या पुढच्या म्हणजेच 12व्या हप्त्याबाबत बोलायचे झाले तर करोडो शेतकऱ्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता, मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवू शकते.
या योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.