Pm Kisan Scheme Rule : पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेचे वितरण केले जात आहे.आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
आता शेतकऱ्यांना सोळाव्या हफ्त्याचे वेध लागले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, या महत्त्वाकांक्षी योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.वास्तविक या योजनेची सुरुवात होऊन आता जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
तरीही या योजनेच्या काही नियमांबाबत शेतकऱ्यांना माहिती नाही. शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एका कुटुंबातील किती लोक लाभ घेऊ शकतात? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारला जात आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे नियम याबाबत काय सांगतात, एका परिवारातील किती सदस्य पीएम किसानचा लाभ घेऊ शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय सांगतो पीएम किसानचा नियम
ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेबाबत अनेक नियम तयार केले आहेत. या नियमांचे लाभार्थी शेतकऱ्यांना पालन करावे लागते. जर पीएम किसान योजनेच्या अटी आणि निकषांचे पालन झाले नाही तर कारवाई होऊ शकते.
अनेक लोकांना असा प्रश्न पडलाय की एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळू शकतात का ? तर, आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आहे.
यामुळे या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका सदस्याला घेता येतो. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशाच शेतकऱ्याला याचा लाभ मिळतो. म्हणजे कुटुंबातीलच सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल अशा सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
मात्र जर कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर जमीन असेल तर अशा सर्व जमीन धारक शेतकऱ्यांपैकी फक्त एकाच शेतकऱ्याला हा लाभ मिळेल.
जर एखाद्या कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य योजनेचा लाभ घेत असतील तर अशा सदस्यांवर कारवाई होऊ शकते. त्यांच्याकडून योजनेची रक्कम वसूल केली जाऊ शकते.