Pm Kisan Sanman Nidhi Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेचा पुढील तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.
दुसरीकडे लाडक्या बहिणी नंतर आता शेतकरी राजांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. देशभरातील पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अठरावा हप्ता कधी जमा होणार याची माहिती सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पी एम किसान अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
हे पैसे एकाच वेळी न देता दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जातात. म्हणजेच एका वर्षात या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तीन हप्ते मिळतात. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 17 हफ्ते देण्यात आले आहेत.
मागील सतरावा हप्ता हा 18 जून 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेचा पुढील अठरावा हप्ता हा नवरात्र उत्सवात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याची बातमी सरकारकडून समोर आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 ला पात्र ठरणाऱ्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या लाभाचे वितरण होणार आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया रिपोर्टमध्ये या योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा होईल असे म्हटले जात होते. यानुसार आता सरकारने या योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल असे जाहीर केले आहे.
ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात या योजनेचा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने याचा कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचा नवरात्र उत्सव आनंदात साजरा होणार आहे.