Pm Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना संपूर्ण देशात चालवली जात आहे. ही योजना देशातील गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.हे वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यांमध्ये मिळत असतात.
म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे मिळतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
अर्थातच जर एखाद्या शेतकऱ्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला असेल तर त्याला आत्तापर्यंत 24 हजार रुपये मिळाले असतील. दरम्यान आता या योजनेचे पात्र शेतकरी तेराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरं पाहता, पीएम किसानचा दहावा आणि अकरावा हप्ता देशभरातील दहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आला होता.
मात्र तदनंतर सरकारने केवायसी बंधनकारक केल्यानंतर तसेच जमिनीबाबत तपशील सादर करण्यास अनिवार्य केल्यानंतर या योजनेच्या लाभार्थी संख्येत घट आली आहे. सद्यस्थितीला आठ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे म्हणजे जवळपास दोन कोटी शेतकरी बांधवांना या योजनेपासून वगळण्यात आले आहे.
अशातच आता देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि कुठे ना कुठे मकर संक्रांतीच्या पर्वावर गोड बातमी समोर येत आहे.खरं पाहता मोदी सरकारकडून मकर संक्रांतीच्या आधीच शेतकऱ्यांना तेरावा हप्ता दिला जाऊ शकतो अशा आशयाचे मीडिया रिपोर्ट वेगाने व्हायरल होत आहेत.
याबाबत केंद्र शासनाने कोणतीच अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र मकर संक्रांतीचा चांगला महूर्त लक्षात घेता शासनाकडून मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला किंवा त्या आधीच शेतकऱ्यांना दोन हजाराचा तेरावा हप्ता देण्यात येऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये झाला आहे.
यामुळे जर मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतिपूर्वी पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता मिळाला तर निश्चितच शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात मोठी दिलासादायक अशी मदत या माध्यमातून होणार आहे.
या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी ती म्हणजे गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजीचं या योजनेचा हप्ता मिळाला होता. यामुळे यंदा देखील जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळू शकतो असा अंदाज जाणकारांनी देखील बांधला आहे.