Pm Kisan Sanman Nidhi Yojana : पी एम किसान सन्माननीती योजना ही केंद्र पुरस्कृत एक महत्त्वाकांक्षी शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील करोडो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
विशेष म्हणजे या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना हे वार्षिक सहा हजार रुपये एकरकमी न देता दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने दिले जातात. दरम्यान आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 12 हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत.
शेतकरी बांधव आता तेराव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत असून 13 वा हप्ता 23 जानेवारी रोजी म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
दरम्यान आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमात एकूण चार बदल झाले आहेत. आज आपण हे बदल कोणते आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्टनुसार, जे शेतकरी बांधव खाली दिलेल्या चार नियमांचे पूर्तता करत असतील त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञय केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, ज्या पात्र शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये तो शेतकरी त्या जमिनीचा वास्तविक मालक आहे असं नमूद केल असेल त्यालाच या योजनेचा लाभ मिळेल.
याशिवाय, या योजनेअंतर्गत केवायसी बंधनकारक करण्यात आली असून पीएम किसान पोर्टलवर ज्या शेतकऱ्याने त्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल त्यालाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक केलेले असणे अनिवार्य राहणार आहे.
तसेच सदर योजनेच्या पात्र शेतकऱ्यांनी बँक खाते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी देखील जोडलेले असणे अपेक्षित आहे.
दरम्यान या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास शेतकरी बांधव हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकणारं आहेत. याशिवाय या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच समस्येच्या निराकरणासाठी [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून आपली समस्या सोडवू शकणार आहेत.