Pm Kisan Sanman Nidhi Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाची योजना आहे. खरे तर या योजनेला आता पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे.
मात्र या योजनेसंदर्भात अजूनही अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. तसेच या योजनेच्या नियमांमध्ये देखील काही बदल झालेले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच एका आर्थिक वर्षात तीन समान हफ्ते मिळतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 17 हप्ते प्राप्त झाले आहेत.
मागील सतरावा हप्ता हा वाराणसी येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. मागील हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हफ्त्याची आतुरता लागलेली आहे.
दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा कुटुंबातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो या संदर्भात विचारणा केली जात आहे. यामुळे आज आपण या संदर्भात पीएम किसान योजनेचे नियम काय सांगतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पीएम किसानचा लाभ कुटुंबातील किती सदस्यांना मिळतो
या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एका सदस्यालाचं लाभ मिळतो. पंतप्रधान किसान योजनेसाठी एकापेक्षा जास्त सदस्यांनी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज रद्द होतो. यासाठी अर्जदाराच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणेही आवश्यक आहे.
म्हणजे याचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळतो. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्यांना लाभ मिळत नाही. जेव्हा तुम्ही या PM किसान सन्मान निधी योजनेत सामील व्हाल, तेव्हा तुम्हाला हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काही काम करावे लागणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने तीन कामे आहेत. पहिली म्हणजे ई-केवायसी, दुसरी जमीन पडताळणी आणि तिसरी म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक करणे. हे काम करून घेणाऱ्या शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
पीएम किसानचा अठरावा हप्ता कधी मिळणार
आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 17 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना पुढील हफ्त्याचे वेध लागले आहे. प्रत्येक चार महिन्यांनी याचा एक हफ्ता दिला जात असतो.
यानुसार 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता जारी करण्यात आला होता आणि आता 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.