Pm Kisan Next Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय. खरे तर 5 ऑक्टोबर 2024 ला या योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत असतात.
यानुसार या योजनेचे 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारी महिन्यात येतील अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो. प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे हे ₹6,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात.
यानुसार या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत अजून केंद्रातील सरकारकडून कोणतीचं अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये फेब्रुवारी मध्येच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असा दावा होतोय. नक्कीच फेब्रुवारीमध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेत तर याचा त्यांना फायदा होणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेचा पैसा देखील फेब्रुवारीमध्येचं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीएम किसान योजनेचे पैसे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.
नमो शेतकरीचे आतापर्यंत पाच हप्ते मिळाले असून शेतकरी बांधव सहाव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा सोबतच शेतकऱ्यांना मिळाला होता.
यामुळे नमो शेतकरी चा सहावा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता सोबत मिळणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसदीय समितीने शिफारस केली आहे.
यामध्ये किसान सन्मान निधीची रक्कम वाढवण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम सहा हजारांवरून 12 हजारांपर्यंत वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे पैसे वाढणार का ही देखील गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.