Pm Kisan News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेत आहेत. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. गरजू शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकदाच दिले जात नाहीत. टप्प्याटप्प्याने या पैशांचे वाटप होते. दर 4 महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. अशा तऱ्हेने एका वर्षात 3 हप्त्यांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळते.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत. मागील 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त पंतप्रधान महोदय झारखंडमधील खुंटी येथे गेले होते.
तिथेच त्यांनी एका कार्यकर्माच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला होता. खरेतर नोव्हेंबर महिन्यात या योजनेचा हप्ता जमा झाला आहे, तसेच आता जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार ? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
खरे तर ही योजना सुरू होऊन बराच काळ उलटला आहे. मात्र देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या माध्यमातून पिता आणि पुत्र दोघांनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो का हा सवाल उपस्थित केला जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण पीएम किसान योजनेचा पिता-पुत्र दोघांनाही लाभ मिळतो का, पुढील सोळावा हप्ता एकाच कुटुंबातील शेतकरी पिता पुत्राला मिळू शकतो का याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबासाठी सुरू झालेली केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे काही नियम आहेत. या नियमानुसार एका शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
म्हणजेच जर एका कुटुंबातील पती या योजनेचा लाभ घेत असेल तर पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जर पिता या योजनेचा लाभ घेत असेल तर या योजनेचा पुत्राला देखील लाभ मिळणार नाही. शिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
म्हणजेच ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे जर पिताच्या नावावर सातबारा असेल तसेच पुत्राच्या नावावरही सातबारा असेल तरी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार असल्याने पिता किंवा पुत्र या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे.
एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केल्यास, त्याचा अर्ज रद्द केला जाईल. म्हणजे पिता आणि पुत्र दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.