Pm Kisan News : पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी योजनेपैकी एक असल्याचा दावा केला जातो. ही योजना पूर्णपणे केंद्राच्या निधीतून चालवली जाणारी एक शेतकरी हिताची योजना आहे.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट रक्कम दिली जाते. म्हणूनच ही योजना अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. खरं पाहता आत्तापर्यंत अनेक शेतकरी हिताच्या योजना सुरू करण्यात आल्या मात्र या शेतकरी हिताच्या योजनेमध्ये वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान प्रामुख्याने पाहायला मिळाले आहे.
परंतु इतिहासात पहिल्यांदाच अशी एक योजना आणली गेली आहे जी शेतकऱ्यांना थेट पैसे देते. यामुळे जाणकार लोकांकडून या योजनेचे कायमच समर्थन केले गेले आहे. विशेष म्हणजे अनेक जाणकार लोकांनी या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. अनेकांनी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेतून केंद्र शासनाने वाढ केली पाहिजे असा प्रस्ताव केंद्र शासनापुढे मांडला आहे. विशेष म्हणजे हे सारे प्रस्ताव तज्ञ लोकांनी केंद्र शासनाला पाठवले आहेत.
अशा परिस्थितीत पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जी काही रोख रक्कम दिली जाते त्यामध्ये वाढ होईल का? हा प्रश्न शेतकऱ्यांना कायमच पडलेला असतो. जाणकार लोक देखील या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी याबाबत एक मोठी माहिती लोकसभेत सार्वजनिक केली आहे. तत्पूर्वी आपण या योजनेची सद्यस्थिती पाहून घेऊया.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जात आहे. विशेष बाब अशी की आपल्या महाराष्ट्रातील एक कोटी शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत. ही संख्या मध्यंतरी कमी झाली असली तरी देखील एका अंदाजानुसार एक कोटीच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे. खर पाहता या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात.
मात्र हे 6000 रुपये शेतकऱ्यांना एक रकमी न देता टप्प्याटप्प्याने दिले जातात. म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने एका वर्षात तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 12 हफ्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. विशेष बाब अशी की लवकरच या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. अशातच मात्र या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत दोन हजाराची वाढ करण्याचा मोदी सरकार विचार करत असल्याचीं माहिती काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये देण्यात आली.
म्हणजेच सध्या स्थितीला जो काही वार्षिक सहा हजाराचा लाभ मिळत आहे त्यामध्ये दोन हजाराची वाढ म्हणजेच वार्षिक 8000 रुपये या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळतील असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला गेला. त्यामुळे शेतकरी बांधव या योजनेच्या रकमेत खरंच वाढ होईल का याबाबत संभ्रम अवस्थेत सापडले. अशा परिस्थितीत आता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेच्या रकमेत सरकार वाढ करण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना लोकसभेत बहुमूल्य माहिती दिली आहे.
खरं पाहता नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ केली जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला गेला होता. मात्र केंद्र शासनाने या योजनेच्या रकमेत वाढ केली नाही. दरम्यान आता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबत माहिती देताना सांगितले की, तूर्तास केंद्र सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करण्याच्या तयारीत नाहीये. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेच्या रकमेत वाढ केली जाईल अशा आशयाच्या चर्चा सुरू होत्या, अशा चर्चाना तूर्तास तरी पूर्णविराम लागणार आहे.