Pm Kisan News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पी एम किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. हा लाभ शेतकऱ्यांना एकूण तीन समान हप्त्यात मिळतो.
अर्थातच दर चार महिन्यांनी या योजनेअंतर्गत दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे वितरित केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हप्ते देशातील पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. दरम्यान 14 वा हप्ता केव्हा मिळणार? याबाबत संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे.
अशातच केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या हफ्त्यासोबतच दिला जाणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान योजनेचेच शेतकरी पात्र राहणार आहेत.
अर्थातच आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील हफ्त्यासोबत चार हजार रुपये मिळणार आहेत. खरंतर पीएम किसानचा हा पुढील 14 वा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल असे सांगितले जात होते. मात्र जून महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अशातच मात्र एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पीएम किसानचा चौदावा हप्ता हा 15 जुलै नंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. अर्थातच 15 जुलै नंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही तारखेला 14 वा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांना मिळू शकतो. एकंदरीत आगामी काही दिवसात शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आणि पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
13वां हफ्ता केव्हा मिळाला होता?
या योजनेचा तेरावा हप्ता हा शेतकऱ्यांना 27 फेब्रुवारी 2023 रोजी मिळाला होता. यामुळे या योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र आता जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा पुढील हप्ता मिळेल असे सांगितले जात आहे.
पण ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाहीये त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून केले जात आहे.