Pm Kisan News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. विशेष बाब अशी की आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
या योजनेअंतर्गत दिले जाणारे 6000 रुपये हे दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने दिले जातात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान तेरावा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशातच मात्र या योजनेबाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
खरं पाहता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट रोख रकमेचा लाभ दिला जातो. शिवाय ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. तसेच ही योजना गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ उचलत असल्याची धक्कादायक माहिती जेव्हा केंद्र शासनाच्या लक्षात आली त्यावेळी केंद्र शासनाने या योजनेच्या धोरणात मोठा अमुलाग्र बदल केला.
आता या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जमिनीची पडताळणी करणे देखील आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाब बनली आहे. त्याशिवाय या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँकेसोबत लिंक करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. जे शेतकरी बांधव आपले आधार कार्ड बँकेसोबत लिंक करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा कायमचा बंद केला जाऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे.
दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील 14 लाख 32 हजार पीएम किसान च्या पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड बँक सोबत संलग्न केलेले नाही. अशा परिस्थितीत या साडेचौदा लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपले बँक खाते आधार सोबत लिंक करावे लागणार आहे. विशेष बाब अशी की इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मोहीम राबवली जात आहे.
या मोहीमच्या माध्यमातून पी.एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.
यासाठी अशा शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे लागणार आहे. तसेच हे बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ही मोहीम 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण राज्यात सुरू राहणार आहे.
यामुळे याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी ही प्रलंबित कामे लवकरात लवकर करून घ्यावी आणि या योजनेचा अविरतपणे लाभ घ्यावा असा आवाहन केले जात आहे. दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पीएम किसान योजनेत खरच वाढ होईल का हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपणास खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.