Pm Kisan Mandhan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपसण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो. दरम्यान 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही अशीच एक कौतुकास्पद योजना आहे. याअंतर्गत शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. 6000 रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका आर्थिक वर्षात एकूण तीन हप्त्यांच्या स्वरूपात दिले जात आहेत.
आतापर्यंत पीएम किसान योजनेचे एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले असून आगामी सतरावा हप्ता निवडणूक झाल्यानंतर अर्थातच चार जून नंतर केव्हाही वितरित होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे पीएम किसान मानधन योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना असूनही याअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
तथापि देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेचे उद्देश काय आहे
या योजनेचे उद्दिष्टे म्हणजे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात मदत करणे. सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अर्थातच वृद्धापकाळत पेन्शन मिळते. दुसरीकडे खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कंपनीच्या माध्यमातून पीएफ चा पैसा मिळतो.
याशिवाय खाजगी क्षेत्रातील कर्मचारी इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात ज्याचा परतावा त्यांना वृद्धापकाळात मिळतो. पीएम किसान मानधन योजना ही देखील याच धर्तीवर सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ घेता येतो. यासाठी मात्र शेतकऱ्यांना सुरुवातीला नाममात्र रक्कम गुंतवावी लागते.
योजनेचे स्वरूप कसे आहे
देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. म्हणजेच ही योजना प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी नाही. ज्या शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन हवी आहे ते शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागी झाल्यानंतर शेतकऱ्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते.
ही रक्कम शेतकऱ्यांना दरमहा जमा करावी लागते. जर एखाद्या शेतकऱ्याने 18 व्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्याला दरमहिना 55 रुपये भरावे लागतात. तसेच जर एखाद्या शेतकऱ्याने 40 व्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्याला दर महीना 200 रुपयाची गुंतवणूक करावी लागते.
योजनेत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्याचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला मग दर महिन्याला 3 हजार रुपये अशी वार्षिक 36 हजार रुपयांची पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील कृषी विभागाशी संपर्क साधू शकता. किंवा मग जवळील आपले सेवा केंद्रावर जाऊन देखील या योजनेसाठी अर्ज सादर करता येतो.