Pm Kisan Latest Update : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे केंद्रातील मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना या महत्वाकांक्षी योजनेबाबत. पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याची तारीख आता फिक्स झाली आहे.
खरतर, पीएम किसान ही 2019 मध्ये सुरु झालेली मोदी सरकारची एक महत्वाची शेतकरी हिताची योजना आहे.या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ पुरवला जात आहे.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्तांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाच्या माध्यमातून वर्ग केली जात आहे. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे.
मागील 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेचा हफ्ता दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.
त्यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता खात्यात केव्हा जमा होणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वास्तविक 14 वा हफ्ता जमा होऊन आता साडेतीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटत चालला आहे.
त्यामुळे आता पंधराव्या हफ्त्याची आतुरता लागली आहे. दरम्यान, पीएम किसानचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शासनाने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची तारीख फिक्स केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
केव्हा जमा होणार 15 वा हफ्ता
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणानिमित्त केंद्रातील मोदी सरकार देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
भाऊबीजच्या दिवशी अर्थातच 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसानचा पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांचा खात्यात जमा होईल अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.
यंदा 15 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. 15 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता शासनाच्या माध्यमातून या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
निश्चितच जर भाऊबीजच्या दिवशी केंद्र शासनाने या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले तर दिवाळीच्या काळात हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.