Pm Kisan: मित्रांनो मोदी सरकारने (Modi Government) देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी 2019 पासून पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) नामक शेतकरी हिताची योजना (Farmer Scheme) संपूर्ण देशात अमलात आणली आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत केली जाते. हे सहा हजार रुपये मोदी सरकार दोन हजार रुपयाच्या एकूण तीन हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत असते. नुकत्याच केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा 11वा हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 12 वा हप्ता लवकरचं येणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेसाठी पात्र असाल अन अद्याप या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर आजच करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे 2022 रोजी 10 कोटी शेतकऱ्यांसाठी सुमारे 21,000 कोटी रुपयांची रक्कम निश्चित करून योजनेचा 11 वा हप्ता जारी केला होता. अशा परिस्थितीत तुमच्या खात्यात 11व्या हफ्त्याचे पैसे आले आहेत की नाही हे कसं चेक करायचं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
खात्यात हप्ता आला की नाही हे कसे तपासायचे
- सरकारच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- आता होमपेजवर फार्मर्स कॉर्नरवर जा.
- आता लाभार्थी स्थितीवर जा. त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. यादीत शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या बँक खात्यावर पाठवलेली रक्कम दाखवली जाईल.
- आता तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.
- त्यानंतर Get data वर क्लिक करा.
पीएम किसान मनी स्टेटस कसे तपासायचे
- पीएम किसान लाभार्थी यादी तपासण्यासाठी फार्मर्स कॉर्नरला भेट द्या.
- त्यानंतर लाभार्थी यादीवर क्लिक करा.
- त्यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- त्यानंतर Get report वर क्लिक करा. सर्व माहिती तुमच्या समोर असेल.
हप्ता न मिळाल्यास या क्रमांकावर तक्रार करा
जर तुम्हाला अद्याप 11 वा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 011-24300606 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबर (155261) वर कॉल करू शकता. यासोबतच [email protected] या ईमेल आयडी वर तुम्ही मेल देखील करू शकता.