PM Awas Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील करोडो नागरिकांसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. या शासकीय योजनांच्या माध्यमातून देशातील वंचित आणि शोषित कुटुंबांचे हित जोपसण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होत आहे. देशातील कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार तसेच शासकीय कर्मचारी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत.
गरीब लोकांना घरकुल देण्यासाठी देखील शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातील काही योजना केंद्र शासनाकडून राबवल्या जात आहेत तर काही योजना राज्य शासन राबवत आहे. आपल्या राज्याचा विचार केला तर राज्य शासनाच्या माध्यमातून शबरी आवास योजना, रमाई आवास योजना शिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील ओबीसी समाजातील नागरिकांसाठी सुरू केलेली नमो आवास योजना या घरकुलाच्या योजना सुरू झाल्या आहेत.
तसेच ज्या लोकांकडे घर नाही किंवा कच्चे घर आहे अशा लोकांसाठी केंद्र शासनाने पीएम आवास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांना केंद्र शासनाकडून घर बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
कारण की, आज आपण पीएम आवास योजनेसाठी अर्ज करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते नागरिक पीएम आवास योजनेसाठी अपात्र राहणार आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम आवास योजनेसाठी अर्ज भरताना ही काळजी घ्या
जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करत असाल तर आधी तुम्ही अपात्र आहात की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय आवश्यक राहणार आहे. कारण की, तुम्ही जर अपात्र असूनही या योजनेसाठी अर्ज केला तर तुमचा अर्ज नाकारला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर यामध्ये प्रथम लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर अर्जदाराची चौकशी केली जाते.
मग सर्वकाही बरोबर असेल म्हणजे अर्ज केलेले अर्जदार जर पीएम आवास योजनेच्या लाभासाठी पात्र असतील तरच त्यांना घर बांधण्यासाठी पैसे दिले जातात. यामुळे जर तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तरच या योजनेसाठी अर्ज करा अन्यथा अर्ज करून तुमचे पैसे वाया घालवू नका.
पीएम आवास योजनेसाठी कोण राहणार अपात्र ?
पीएम आवास योजनेच्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे दुचाकी, तीन चाकी वाहने तसेच चार चाकी वाहन आहे असे लोक यासाठी अपात्र आहेत. म्हणजे या लोकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्याकडेही यापैकी एखादे वाहन असेल तर तुम्ही या घरांसाठी अर्ज केला तरी देखील अपात्र ठरणार आहात.
एवढेच नाही जर तुमच्याकडे अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तसेच लँडलाइन कनेक्शन किंवा फ्रीज इ. महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तरीही तुम्ही या पीएम आवास योजनेसाठी अपात्र राहणार आहात. याव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांकडे पन्नास हजार रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीएम आवास योजनेचा लाभ मिळणार नाहीये.