PM Awas Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. बेघर लोकांसाठी देखील केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील असून अशा बेघरांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी बेघर योजना राबवल्या जातात.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील बेघरांना हक्काचे घर मिळावे यासाठी शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना अशा योजना राबवल्या जात आहेत.
यापैकी मोदी आवास योजना ही अलीकडेच सुरू झालेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना आता हक्काचे घर मिळणार आहे.
तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत गरजू लोकांना घरासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
यामुळे देशातील अनेकांचे घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून पीएम आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येऊ शकतो याविषयी विचारणा केली जात होती.
अशा परिस्थितीत आज आपण पीएम आवास योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा
पीएम आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे हेतू आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. http://pmayg.nic.in/ या पीएम आवास योजनेचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर जे नागरिक या लाभासाठी पात्र राहतील त्यांना घरासाठी अनुदान पुरवले जाणार आहे.
पीएम आवास योजनेचा कोणाला लाभ मिळतो
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. कोणत्याही जाती किंवा धर्माच्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
मध्यमवर्ग १ आणि मध्यमवर्ग 2 मधील नागरिक पीएम आवास योजनेसाठी पात्र आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच कमी उत्पन्न असलेले लोक पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
कोण कोणती कागदपत्रे लागतात
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी अर्ज करणे हेतू अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचा आयडी-पुरावा, अर्जदाराचे बँक खाते, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात. अर्जदाराचे बँक खाते मात्र आधार क्रमांकाशी संलग्न असावे.