Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment : राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता राज्यात गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारीचा दर लक्षणीय वाढला आहे. बेरोजगारीचे वाढणारे प्रमाण हे निश्चितच राज्याच्या दृष्टीने घातक आहे. दरम्यान आता बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लवकरच एक मोठी भरती होणार आहे.
वास्तविक पिंपरी चिंचवड हे शहर आता वेगाने विस्तारू लागला आहे. साहजिकच यामुळे महानगरपालिकेवर कामाचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या आकृतीबंधात सुधारणा करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. दरम्यान आता या आकृतीबंधात सुधारणा झाली आहे. सुरुवातीला या महानगरपालिकेच्या आकृतीबंधात 11,513 पदे मंजूर करण्यात आले होते.
हे पण वाचा :- नुसताच बोभाटा ! वंदे भारत एक्सप्रेस बाबत समोर आली ‘ही’ मोठी माहिती; टाटाने दिल स्पष्टीकरण
तर आता या सुधारित आकृतीबंधानुसार 16838 पदे मंजूर राहणार आहेत. म्हणजेच नवीन 5325 पदांसाठी मान्यता या सुधारित आकृतीबंधाच्या माध्यमातून मिळाली आहे. म्हणजेच आता पिंपरी चिंचवड महापालिकेत 16838 विविध पदांची निर्मिती झाली आहे. यापैकी केवळ 7 हजार 53 अति आवश्यक पदे भरली गेली आहेत.
यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शासनाने मान्यता दिल्यानंतर एक मोठी मेगा भरती आयोजित होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून येणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प ‘या’ महिन्यात होणार सुरु, फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली
दरम्यान कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी महापालिकेकडून नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.
यासाठी उमेदवारांनी मोठा प्रतिसाद दिला असून जवळपास एक लाख तीस हजार अर्ज या पदांसाठी प्राप्त झाले आहेत. आता या पदांसाठीची परीक्षा मे महिन्यात होणार आहे. दरम्यान महापालिकेमध्ये जी जुन्या आणि सुधारित आकृतीबंधानुसार हजारो रिक्त पदे आहेत त्यावर देखील लवकरच मेगा भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे तरुणांना लवकरच पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून येणार आहे.
हे पण वाचा :- केंद्रे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; जगातील ‘या’ सर्वाधिक उंचीच्या पुलावर धावणार आता वंदे भारत एक्सप्रेस