Pimpri Chinchwad Municipal Corporation : भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास आहे. यामुळे देशातील ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत.
ग्रामीण भागातही गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विकास झाला आहे. पुण्यानजीक असलेल्या पिंपरी, चिंचवड व आजूबाजूच्या गावाचाही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आहे.
खरंतर 1970 मध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी ही चार गावे मिळून पिंपरी-चिंचवड नगरपालिका तयार करण्यात आली. त्यानंतर 1982 मध्ये ही महापालिका बनली. विशेष म्हणजे या महापालिकेने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणूनही बहूमान पटकावला.
यानंतर या महानगरपालिकेत तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे आणि ताथवडे या गावांचा समावेश करण्यात आला.
अशातच आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नव्याने सात गावांचा समावेश केला जाणार आहे. खरेतर याबाबत 2015 मध्ये महापालिकेने ठराव तयार केला होता. मात्र गेली नऊ वर्षे यावर कोणताच निर्णय झाला नाही.
आता मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नव्याने सात गावांचा समावेश होणार अशी घोषणा केली आहे.
गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या सात गावांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश केला जाणार आहे. याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच हे जाहीर केले जाणार आहे.
मात्र हिंजवडी आणि मान येथील ग्रामस्थांनी या निर्णयाचा विरोध सुरू केला आहे. महापालिकाऐवजी स्वातंत्र नगरपरिषद झाली पाहिजे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
यामुळे आता यावर शासनाकडून काय तोडगा काढला जातो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच ही प्रस्तावित करण्यात आलेली सात गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट होतात का ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.