Pik Vima Yojana : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली. तसेच या योजनेची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासूनच केली जाणार असे जाहीर केले. यानुसार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. दरम्यान यावर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत आता नुकसान भरपाई मिळण्याची आशा आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी आवश्यक असलेला पंचनामा लवकरच केला जाणार आहे.
मात्र असे असले तरी पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीक पेरा बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र अजूनही राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी पिक पेरा नोंदवलेला नाही. यामुळे सरकारने पीक पाहणी करण्यासाठी आणखी काही काळ शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी अनेकांकडून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर पिक पाहणी करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक पाहणी करता येते. यासाठी आधी राज्य शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती. मात्र मुदतीत अनेक शेतकऱ्यांना पीक पाहणी करता आलेली नाही.
त्यामुळे अनेकांकडून पीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जात होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पीक पाहणी करण्यासाठी तब्बल 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. खरंतर मध्यंतरी पीक पाहणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या एप्लीकेशन मध्ये सर्वर डाऊनच्या प्रॉब्लेम मुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी करता आली नाही.
एप्लीकेशन लोड न होणे, सर्वर डाऊन असणे, अंतिम अहवाल न येणे यांसारख्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी आधी दिलेल्या मुदतीत पूर्ण करता आली नाही. यामुळे आता ही मुदत 15 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांना मुदतीत पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे.