Pik Vima : शेतकरी बांधवांना शेती करताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. विशेषता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून पिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी अनुषंगाने पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना असं या योजनेचे नाव असून खरीप हंगामातील पिकांसाठी तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी या योजनेच्या माध्यमातून पिक विमा उतरवला जातो. राज्यातील लाखो शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी पिक विमा उतरवला होता.
आता अशा शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम संबंधित पिक विमा कंपनीकडून वर्ग केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिक विम्याची रक्कम मिळत आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळत असलेली ही नुकसान भरपाई त्यांच्यासाठी विशेष फायद्याची ठरत आहे. खरीप हंगामातील पिक विमा साठी जिल्ह्याला 15 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या 13 हजार 170 शेतकरी बांधवांच्या खात्यात सात कोटी 32 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जिल्ह्यातील 26825 शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीकडून शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.
दरम्यान पिक विमाच्या नियमानुसार शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसान झाल्याच्या 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपनीकडे पिक विमा साठी दावा करावा लागतो. या अनुषंगाने राज्यातील पीक विमा धारक शेतकरी बांधवांनी कंपनीकडे नुकसानीचा दावा केला आहे. दावा केल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे आणि पाहणी झाली.
यानंतर नुकसानीचा अहवाल संबंधित पिक विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आला. अहवाल दिवाळीपूर्वीच कंपनीकडे जमा झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे आशा होती. मात्र तांत्रिक कारणामुळे पीक विमा रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. मात्र आता दिवाळीनंतर 13170 शेतकरी बांधवांना सात कोटी 32 लाख रुपयांचा पिक विमा मिळाला आहे.
उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच पिक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याचे कृषी विभागाकडून नमूद करण्यात आले आहे. खरिप हंगामात वर्धा जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकांचा पिक विमा उतरवला आहे. जिल्ह्यातील १४७ मंडळांतील २६ हजार ८२५ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पिक विमा उतरविला होता.
दरम्यान खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पीकविमा उतरविलेले सर्वच शेतकरी पिक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरले आहे. आता गत सात वर्षांच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई संबंधित पिक विमा धारक शेतकरी बांधवांना देण्यात आली आहे. पिक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात रक्कम मिळू लागली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यातील १३,७८१ शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकासाठी ७ कोटी ३९ लाख ७४ हजार एवढा पिक विमा मिळणार असून कापूस पिकासाठी ९,८११ शेतकऱ्यांना ७ कोटी ३४ लाख ७३ हजार रुपये इतकी पिक विमा रक्कम मिळणार आहे. तसेच तूर पिकासाठी ३,२३३ शेतकरी बांधवांना ६० लाख ३५ हजार रुपये एवढी पिक विमा रक्कम मंजूर झाली आहे. यापैकी तेरा हजार 170 शेतकरी बांधवांना सात कोटी 32 लाख रुपयांची मदत मिळाली असून उर्वरित शेतकरी बांधवांना लवकरच पिक विमा रक्कम मिळणार आहे.